मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुखां सोबत घेतली आँनलाईन बैठक संपन्न झाली.कोवीड काळातील काम व शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा कण्यात आली.कोरोना काळातील कामकाजात शिक्षकांचा असणारा मोठा सहभाग व त्याअनुषंगाने शिक्षकांचे असणारे प्रश्न याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मा.राजेंद्र डुडी ,शिक्षणाधिकारी मा.विष्णू कांबळे,उपशिक्षणाधिकारी मा.महेश धोत्रे आदींच्या उपस्थितीत आज सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी यांची आँनलाईन मिटींग पार पडली.
सदर मिटींगला शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक व शिक्षक समीतीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड,शिक्षक संघ थोरात गट जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक संघ शि.द.गट जिल्हाध्यक्ष मुकूंद सूर्यवंशी, पूरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती शिरतोडे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे, म.रा.प.प्राथ.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने,पदवीधर केंद्र प्रमुख सभेचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण,खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,उर्दू शिक्षक संघटनेचे प्रमुख मुस्तफा पटेल,कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,माध्यमिक शिक्षक संघटनेचे अम्रुत पांढरे,नागरगोजे सर,किशोर पाटील,विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे प्रमोद पाटील,शिक्षक नेते माजी आमदार भगवानराव साळुंखे आदी उपस्थित होते.सदर मिटिंग मधील चर्चेत खालील निर्णय मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतले आहेत.
▪️कोरोना ड्युटीचे आदेश सक्षम अधिकारी बी.डी.ओ.यांच्या सहीने निर्गमित केले जातील.गाव पातळीवरून आदेश दिले जाणार नाहीत याबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी बी.डी.ओ.ना पत्र पाठवणार.
▪️रोटेशन पद्धतीने शिक्षकांना आदेश दिले जाणार.समन्यायी पद्धतीने कोरोना ड्युटी आदेश अमंलबजावणी होणार.
▪️शिक्षकांना कोरोना विमा कवच लागू आहे .याबाबत माहिती देण्यात आली.
▪️शिक्षकांना लसीकरण पहिला डोस देणेसाठी माहिती संकलित करून विशेष मोहिम राबवणार.दुसऱ्या डोसबाबत शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे सी.ई.ओ.नी केले आवाहन.
▪️शिक्षकांसाठी कोरोना बेड मिळणेबाबत जिल्हा परिषद स्तरावरून समन्वयक नेमणूक करणार.
▪️कोरोना काळात काम करणाऱ्या सर्व शिक्षकांना जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कोव्हीड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देणार.
▪️ कोविड काळात काम करणाऱ्या शिक्षकांना उन्हाळी सुट्टी असल्याने सदर कर्तव्य कालावधी अर्जित रजेत समाविष्ट करणेसाठी माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल.
▪️दि.16 मे 2021 रोजी मयत झालेले शिक्षक शेख सर यांच्या घरी सी.ई.ओ.चे प्रतिनिधी मा.शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष भेट देणार.
▪️इस्लामपूर येथे माजी आमदार ,शिक्षक नेते मा.भगवानराव साळुंखे उभे करीत असलेले अनाथ मुलांचे पुनर्वसन केंद्राला शक्य ती मदत जि.प.करणार कोव्हीड सेंटर काढण्यासंदर्भात कर्मचारी यांचेकडून निधी संकलन करण्याबाबत मुद्दा चर्चीला गेला.
सदर बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी मा.महेश धोत्रे यांनी केले.