Sanvad News डॉ.बाळासाहेब चोपडे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस एक लाखाची देणगी;सेकंडरी स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

डॉ.बाळासाहेब चोपडे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस एक लाखाची देणगी;सेकंडरी स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये एच. एस.सी. बोर्डा कडून प्राप्त गुणपत्रकांचे वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक गिरीश चितळे होते.भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी संस्थेस एक लाख रुपयाची देणगी दिली.डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी देणगीचा धनादेश गिरीश चितळे यांच्याकडे सुपूर्द केला.
 गिरीश चितळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून,प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा.प्रत्येकाने स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवावा.शिक्षण,उद्योग व नोकरी क्षेत्रात कोवीड मुळे झालेले बदल आत्मसात करावेत असे आवाहन केले.
बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य  देशपांडे यांनी सिनियर कॉलेजच्या प्रवेशासंबंधी माहिती दिली.विद्यार्थिनी कु. प्राची जाधव हिने  मनोगतातून शाळेविषयी चे आपले मनोगत व्यक्त केले. बारावी कला, शास्त्र व वाणिज्य शाखेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष डाॕ. बाळासाहेब चोपडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संचालक डॉ.सुनिल वाळवेकर,डी.के.किणीकर संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने,विभाग प्रमुख प्रा.जी एस. साळुंखे  यांच्यासह ज्युनियर कॉलेज चे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार यांनी,सूत्रसंचालन प्रा.अशोक नलवडे  यांनी केले तर आभार प्रा.दिनकर जगदाळे  यांनी मानले.
To Top