पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात भावगीत,भक्तीगीत गायनाने पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांची पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष उदय परांजपे यांचा वाढदिवसानिमित्त संस्था, शिक्षक ,मित्रपरिवार यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी कलाकारांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुण्यतिथीनिमित्ताने शैक्षणिक संकुलात भावगीत, भक्तिगीत यांचे बहारदार मैफल संपन्न झाली. कु. आर्या किरण पोतदार , वैभवी पोतदार ,हर्षाली माळी ,सृष्टी मोहोळकर, तनया चव्हाण व विद्यार्थीनीनी व सौ. प्रिती नरुले ,बी.डी.चोपडे , विकास कांबळे यांनीही गीते सादर केली. सुमधुर गीते सादर करुन सर्वांची मने जिंकली.
हार्मोनियम साथ जगन्नाथ सुवासे , तबलासाथ किरण पोतदार ,शंकर गस्ते यांनी दिली.यावेळी तू सुखकर्ता दुःखहर्ता,,,, जय शारदे वागेश्वरी.... कानडा राजा पंढरीचा..... पाऊले चालती पंढरीची वाट... दर्शन दे रे दे रे भगवंता..... जनाई करिते हरी भजना... यशोमती मैया से बोले नंदलाला राधा क्यों गोरी... चंद्रभागेच्या तिरी पहा तो विटेवरी....... सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी...... ने मजसी ने परत मातृभूमीला....या गीतांना विशेष दाद मिळाली.
यावेळी मुख्याध्यापक टी.जे. करांडे , प्रतिनिधी हायस्कूलचे मुख्याध्यापक सी.वाय. जाधव सर, पुजारी सर, के टी पाटील ,दत्ताञय बागल ,सिद्धाराम कोळी , जिल्हा परिषद शाळा पलूस चे मुख्याध्यापक राम चव्हाण , मोहन सुतार ,मानुगडे सर, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.अलका बागल ज्युनिअर विभागप्रमुख अविनाश चव्हाण , सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.के.बामणे ,बी.डी.चोपडे ,बी.एन. पोतदार ,एस.एन.गस्ते जे.ए.सुवासे ,सर्व शिक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा .बी.एन.पोतदार यांनी केले.सर्व विद्यार्थी या कार्यक्रमास आँनलाईन उपस्थित होते.