रक्षाबंधन सणानिमित्त क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरूंगवाडी ता.पलूस या शाळेत भेटकार्ड स्पर्धाआयोजित करण्यात आली.
कोरोनाच्या काळात नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.बाहेर महागड्या वस्तू खरेदी करून भेट दिल्यावरच प्रेम,आपुलकी जोपासली जाते असे नाही.कोरोनाच्या काळात खरेदीसाठी बाहेर न पडता,स्वतः च्या कल्पकतेने क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरूंगवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन निमित्त आकर्षक,सुंदर अशी भेटकार्ड तयार केली.धान्य, डाळी,लेस,पुठ्ठे,मणी,बटण,लोकर,टिकल्या, कार्ड शिट पेपर इत्यादींचा वापर करून बहीण भावांच्या गोड नात्यांचे संदेश लिहून भेटकार्ड तयार केले.सर्व शिक्षकांनी मिळून भेटकार्ड चे परीक्षण करून अनुक्रमे तीन व उत्तेजनार्थ तीन क्रमांक काढले.
1. शिवराज उत्तम पवार
2. प्राची सचिन कदम
3.विराज संभाजी यादव
उत्तेजनार्थ
1.साक्षी प्रमोद कणसे
2.यशस्वी संदीप यादव
3. वैभवी संतोष सावंत
संस्थेचे अध्यक्ष सुनील बापू जाधव,संस्थेच्या कार्यवाह सौ.वनिता जाधव,मुख्याध्यापिका दिपाली जाधव व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.उपक्रमशील शाळा अशी जनमानसांत ओळख असणाऱ्या क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन चे पालकवर्गाकडून खास कौतुक करण्यात येत आहे.