Sanvad News भिलवडी शिक्षण संकुलात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

भिलवडी शिक्षण संकुलात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.


भिलवडी शिक्षण संस्थेत ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.देश कोरोना मुक्त व्हावा व पूर्ववत शाळा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक जयंत केळकर,दादासाहेब चौगुले,व्यंकोजी जाधव,प्रा.डी.एस.पाटील,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी,मानसिंग हाके,
प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,शुभांगी मन्वाचार,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदींसह सर्व शाखातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शशिकांत उंडे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचलन केले.संजय मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
To Top