भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक मोहन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.खेळाचा सातत्याने सराव केल्यास आरोग्य सक्षम होईल असे प्रतिपादन डी.के.किणीकर यांनी व्यक्त केले. कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक खेळाडूंनी अधिक सराव करावा. महिला व्हॉलीबॉल मध्ये भिलवडी शिक्षण संस्थेने निर्माण केलेली उज्वल परंपरा टिकविण्याचा संकल्प करावा.
प्रास्ताविक व स्वागत क्रीडा संचालक डॉ.महेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान विभाग प्रमुख प्रा.दिग्विजय मोकाशी यांनी केले.यावेळी प्रा.आर.आर.हिरुगडे,माजी विद्यार्थी आणि राष्ट्रीय खेळाडू सुरज पाटील,संदीप नलावडे, वैभव होगले, सुरेश धोतरे,पूजा कोळी,अक्षदा वावरे,श्वेता पाटील,आरती कांबळे या राष्ट्रीय खेळाडू सह विद्यार्थी उपस्थित होते.