पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात साजरा करण्यात आला.यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक टी.जे.करांडे,क्रीडाशिक्षक संदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ.अलका बागल,जेष्ट शिक्षक ए.जे.सावंत,व्ही.एस.गुरव,ए.बी.पवार,एम.जे.शिरतोडे,जी.एस.पाटील,,सौ.पी.व्ही.नरुले,सौ.एस.आर.साळुंखे सर्व शिक्षकशिक्षिका,उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे व सर्व संचालक मंडळ यांनी सर्वाना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी एस.डी.सावंत म्हणाले हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू मेजर ध्यानचंद होते.हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख असणाऱ्या महान खेळाडूच्या जन्मदिनानिमित्त भारतात 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडले . त्यांच्या हॉकी खेळण्याचे कौशल्य अफलातून होते. चेंडूवरचे नियंत्रण ही त्यांची खासियत होती. त्याग आणि निष्ठेचे प्रतिक असणाऱ्या ध्यानचंद यांच्यासारख्या खेळाडूंची आज देशाला गरज आहे.विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे.आभार प्रा.बी.एन.पोतदार यांनी मानले.