Sanvad News बाबासाहेब चितळे महाविद्यालयास विश्वास चितळे यांच्याकडून लॅपटॉप भेट

बाबासाहेब चितळे महाविद्यालयास विश्वास चितळे यांच्याकडून लॅपटॉप भेट


भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयास संस्थेचे अध्यक्ष व मे.बी.जी.चितळे उद्योग समूहाचे संचालक श्री.विश्वास चितळे यांनी Lenovo कंपनी चे तीन लॅपटॉप भेट दिले.
यावेळी मा.पुष्कर चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना विश्वास चितळे म्हणाले की,या लॅपटॉप चा प्रवेश प्रक्रियेसाठी उपयोग करावा. विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी उस्फूर्तपणे काम करून
महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या वाढवावी व संस्थेचा लौकिक वाढवावा.यावेळी संस्था व महाविद्यालयाच्या वतीने उत्तम काम करणेची हमी संस्थेचे सचिव श्री.संजय कुलकर्णी यांनी दिली.या अमूल्य देणगीबाबत बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी संस्थेचे आजीव सदस्य डॉ.महेश पाटील, संस्थेचे सहसचिव श्री.मानसिंग हाके,विज्ञान विभाग प्रमुख प्रा.डी.एस.मोकाशी उपस्थित होते.
To Top