Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, शिक्षक दिन विविध उपक्रमांनी संपन्न

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात डाँ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती, शिक्षक दिन विविध उपक्रमांनी संपन्न


भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5सप्टेंबर शिक्षक दिन आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था संकुलात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतिमापूजनप्रसंगी मुख्याध्यापक मा.टी.जे. करांडे सर , माधवराव परांजपे प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.अलका बागल ,पालक प्रतिनिधी  मोहन सुतार अशोक कुंभार यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.  संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब ,उपाध्यक्ष सुनिल रावळ,सचिव जयंतीलाल शहा ,संचालक विश्वास रावळ ,सर्व संचालक मंडळ यांनी सर्व शिक्षकांना  शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी NMMS परीक्षेत  उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा.ए.बी.पवार म्हणाले डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. काळ आणि परिस्थिती बदलली तरी शिक्षकाची भूमिका मात्र बदललेली नाही. जसा शिक्षक त्याप्रमाणे राष्ट्र निर्माण होते. समाजात शिक्षकाचे स्थान अतिशय आदराचे आहे.व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. डॉ राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी त्यांनी सांगितल्या. आज शिक्षक म्हणून आपण काय करायला हवे याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केले.   मुख्याध्यापक  टी.जे. करांडे सर म्हणाले समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे शिक्षक येतात की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत जाते. ज्या शिक्षकानी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते आपल्याला आवश्यक असेल अशा वेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी  5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त Thank a Teacher   अभियान राबविण्यात येत आहे यानिमित्ताने विद्यालयात निबंध,चित्रकला, वक्तृत्व, स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.
  यावेळी अशोक कुंभार गुरुजी,मोहन सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या..सुञसंचालन सांस्कृतिक विभाग  प्रमुख बी.डी.चोपडे सर यांनी केले.आभार प्रा.बी.एन.पोतदार सर यांनी मानले


   
To Top