गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सर शैक्षणिक संकुल इस्लामपूर मध्ये शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.आदर्श बालक मंदिर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.राजेंद्र फडतरे,कमलाबाई रामनामे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.गीता सावंत,दा.ल. रामनामे प्राथ.विद्यालयाच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सूर्यवंशी मॅडम,पर्यवेक्षिका सौ.प्रेरणा देशपांडे यांच्या शुभ हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् ,संस्थेचे भूतपूर्व मानद सचिव स्व.गुरुवर्य प्रल्हाद हरी देशपांडे सर यांच्या प्रतिमेचे तसेच श्री.तुळजाभवानी व श्री. सरस्वती प्रतिमा पूजन करून आणि वृक्षास जलार्पण करून सदर कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
सहा. शिक्षिका श्रीमती आयरे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिन साजरा करण्यामागील भूमिका, डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनातील काही प्रसंग व्यक्त केले.सहा.शिक्षक अशोक गिरी यांनी शालेय जीवनातील त्यांना लाभलेल्या शिक्षकांविषयीच्या आठवणी तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रमाणेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुद्धा अमेरिका आपल्या वक्तृत्वाने आणि कर्तृत्वाने कशी गाजविली याविषयीचे मनोगत व्यक्त केले.जयकर जाधव यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील भूतकाळातील आठवणी, शाळेत विद्यार्थ्यां मार्फत साजरा होणारा शिक्षक दिन विद्यार्थी कसा साजरा करत होते, याविषयीच्या गोड आठवणी तसेच आपल्या गायनातून गुरुंबद्दलचे आपल्या जीवनातील स्थान व्यक्त केले. कु.गौरी पाटील, कु श्रृतिका पोळ,कु.श्रेया घोडके, सत्यजित माळी, कु.अनुष्का पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली.
ग्रंथपाल सुरेंद्र वडे यांनी ग्रंथालय हॉलमध्ये सर्व शिक्षकांसाठी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले.प्रास्ताविक व स्वागत कु.श्रावणी जाधव हिने केले.सूत्रसंचालन कु. सायमा पुणेकर यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक एम.आर.पाटील यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड करून सौ.शरयु मोहिते,सौ.कदम मॅडम,संदीप पाटील,दत्ताजी माळी,बी.बी.पाटील यांनी मार्गदर्शन केले.तंत्रस्नेही शिक्षक जयकर जाधव यांनी सदर कार्यक्रम युट्यूब वरून थेट प्रसारित केला. कलाशिक्षक सूरज काळे यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले.
या कार्यक्रमासाठी श्री.तुळजाभवानी शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रा.प्रशांत देशपांडे सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास संस्थेतील तीनही शाखांचे मुख्याध्यापक,मुख्याध्यापिका पर्यवेक्षक,सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे कोरोना बाबतीतले सर्व नियम पाळून नेटके नियोजन करण्यात आले होते. दोन हजार विद्यार्थ्यांनी घरी राहून ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलाकार्यक्रमाचे कोरोना बाबतीतले सर्व नियम पाळून नेटके नियोजन करण्यात आले होते. दोन हजार विद्यार्थ्यांनी घरी राहून ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.