Sanvad News लेकरांच्या हातामध्ये पुस्तके देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा -लेखक संदिप नाझरे;गुंडाळवाडी शाळेत बहरला गप्पांचा रविवार

लेकरांच्या हातामध्ये पुस्तके देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा -लेखक संदिप नाझरे;गुंडाळवाडी शाळेत बहरला गप्पांचा रविवार


ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या ज्या हातात मोबाईल दिला आहे,त्याच हातामध्ये पुस्तके देण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा तरच देशाचे भविष्य उज्वल घडेल असे प्रतिपादन कवी,पत्रकार व इयत्ता सहावी बालभारती पुस्तकातील "पण थोडा उशीर झाला "या पाठाचे लेखक संदीप नाझरे यांनी केले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडाळवाडी जि-पुणे यांच्या वतीने आयोजित गप्पांचा रविवार या ऑनलाईन उपक्रमाचे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील लेखकासोबत मनसोक्तपणे गप्पा मारल्या.बालभारती पाठ्यपुस्तकातील लेखक प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद व समाधान बालगोपाळांनी व्यक्त केले.सचिन पवार सरांनी साहित्य क्षेत्रातील प्रवासाबाबत संदिप नाझरे यांच्याशी चर्चा केली.लेखक संदिप नाझरे यांनी शिक्षकांमुळे मी कसा घडत गेलो याचे अनुभव सांगितले.आईने सांगितलेल्या अनुभवावरुन लिखानाला सुरुवात केल्याचा दाखला दिला.विद्यार्थ्यांशी गप्पा मारतांना उत्तम लेखन करण्यासाठी वाचन करणे महत्वाचे असून मुलांनी कोणते बालसाहित्य वाचावे व लेखनासाठीचे बारकावे आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
गप्पांचा रविवार या उपक्रमाचे आयोजक सचिन पवार ,श्रीमती सुरेखा निकुंभ, सौ.संगीता क्षिरसागर, श्रीमती सुवर्णा वाघमारे या शिक्षकांनी केले.कलाविष्कार मंचाचे सदस्य नारायण करपे, केंद्रप्रमुख विजय सुरकुले यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.सौ.मीरा मिंडे ,वनिता कोल्हे,सचिन पवार आदी शिक्षकांसह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सचिन पवार यांनी केले.सूत्रसंचालन सुरेखा निकुंभ यांनी केले.आभार संगिता क्षिरसागर यांनी मानले.
गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे, विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब पंचायत समिती खेड,गुंडाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय सुरकुले,गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे ,विस्तार अधिकारी सौ.वंदना शिंदे,पंचायत समिती शिरुर करंदी केंद्राचे केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे,सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी(पंचायत समिती खेड व शिरुर) यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
To Top