भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. कृ. श्री. म्हसकर यांचा स्मृतिदिन सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज,भिलवडी या विद्यालयात संपन्न झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी डॉ. म्हसकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी उपमुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने, विज्ञान विषय प्रमुख विजय तेली विज्ञान विषय शिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.