Sanvad News लसीकरण अभियानायमध्ये बाबासाहेब चितळे महाविद्यालय अग्रस्थानी...

लसीकरण अभियानायमध्ये बाबासाहेब चितळे महाविद्यालय अग्रस्थानी...

भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कला व विज्ञान विभागाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.दि.१५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने  कोविड १९ लसीकरण अभियानायमध्ये राबविण्यात आले.भिलवडी आरोग्य केंद्रात जाऊन स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष लसीकरण अभियानायमध्ये भाग घेतला.या प्रसंगी महाविद्यालयाचे.  प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे, प्रकल्प अधिकारी डॉ.विजय गाडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.दत्तात्रय खराडे, ग्रंथपाल डॉ.विकास खराडे यांची उपस्थिती होती.यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान मंदिर,माता बाल संगोपन केंद्र, पंचशीलनगर,महादेव मंदिर परिसर या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.बाबासाहेब चितळे महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. या अभियानात कला व विज्ञान विभागाचे प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांनी सहभाग घेतला.प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे.
To Top