Sanvad News इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये हिंदी दिन साजरा.

इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये हिंदी दिन साजरा.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये हिंदी दिन उत्साहात संपन्न झाला. मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे,सौ.कीर्ती चोपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हिंदी विषय शिक्षिका सौ.सीमा पाटील आणि सौ.मनीषा तेली यांनी संयोजन केले.स्वागत कु निधी खोत हिने, सूत्रसंचालन कु.रोहिणी यादव हिने केले तर आभार कु. सान्वी कोले हिने मानले.देशभक्तीपर गीते,कविता,राष्ट्रभाषे वरती भाषणे,प्रश्नमंजुषा,सुविचार, संस्काराचे महत्त्व,स्वच्छतेवर आधारित कविता असे अनेक कार्यक्रम सादरीकरण केले.
To Top