आंधळी येथील हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलमध्ये ग्रामस्वच्छता अभियानास सुरुवात झाली.यावेळी मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व विशद करुन स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे असे मत प्रकट केले.त्यानंतर समन्वयक सौ.म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी श्री.एम.एन.माने यांनी स्वच्छतेची शपथ दिली व सर्वांनी शालेय परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.आर.आर. गायकवाड यांनी तर आभार श्री.डी.व्ही.बंडगर यांनी मानले.यावेळी ग्रामसेविका सौ.पवार,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक गोरड ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स, ग्रामपंचायत सदस्य, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन आर.आर.पाटील,सौ.यु.एस.गुरव,सौ.एस.पी.पाटील,सौ.एस.एस.कांबळे,यु.बी.शिंदे,बी.एच.जाधव,पी.डी.बंगाल आदींनी केले.