Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळा व इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न.

खाजगी मराठी प्राथमिक शाळा व इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मध्ये शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा व इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व्यवस्थापन समिती सभा संपन्न झाली.भिलवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सविता महिंद-पाटील अध्यक्ष स्थानी होत्या.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत पदाधिकारी,पालक प्रतिनिधी,संस्था पदाधिकारी,शिक्षक प्रतिनिधी अशीचर्चा झाली.सर्वानुमते झालेल्या चर्चेनुसार मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाचे प्राथमिक विभागाचे इयत्ता १ ली ते ४ थी चे वर्ग कोरोना विषयी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करीत सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

यावेळी बोलताना संस्थेचे संचालक गिरीश चितळे म्हणाले की,शाळा सुरू करीत असताना संस्था व शाळा व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेईल.याबरोबरच पालकांनी विद्यार्थ्या सोबतच कौटुंबिक आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे.
संचालक डी. के.किणीकर म्हणाले की,कोरोना रोखण्यासाठी जशी सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही भूमिका घेतली त्याचप्रमाणे मी व माझी शाळा अशी शाळेशी निगडीत असणाऱ्या सर्व घटकांनी जबाबदारी घ्यावी.सरपंच सौ.सविता महिंद पाटील यांनी प्राथमिक विभागाचे वर्ग सुरू करणेबाबत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक व स्वागत खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.संजय पाटील यांनी ऑफलाईन शाळा सुरू करणेबाबत शासन नियमावली विषयी माहिती दिली.शरद जाधव यांनी ऑनलाईन शिक्षण व राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला.इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे यांनी विद्यालयाने राबविलेल्या ऑनलाईन,ऑफलाईन शाळा व विविध उपक्रम,सत्यत्याने टिकवून ठेवलेली दहावी बोर्ड परीक्षेतील शंभर टक्के निकालाची परंपरा याविषयी माहिती सांगितली.सूत्रसंचालन सौ.प्रगती भोसले यांनी केले.अहवाल वाचन सौ. छाया गायकवाड यानी केले. कीर्ती चोपडे यांनी आभार मानले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.सुनिल वाळवेकर,संजय कदम, सचिव संजय कुलकर्णी,सहसचिव मानसिंग हाके,प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,इंग्रजी माध्यम विभागप्रमुख के.डी.पाटील,भिलवडी ग्रामपंचायत सदस्या सौ.सीमा शेटे,सौ.स्वप्नाली रांजणे आदीसह शिक्षक,पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
To Top