Sanvad News इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मधील पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू.

इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मधील पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या,इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी मधील इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग सुरू करण्यात आले.यापूर्वी तिसरे ते दहावी पर्यंतचे वर्ग सुरू होते.विद्यालयातील इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व वर्गाचे कामकाज नियमितपणे सुरू झाले आहे.  
दरवर्षीप्रमाणे पहिलीच्या विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन पहिल्या दिवशी स्वागत करण्यात येते.कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष शाळा बंद असल्यामुळे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेतील वर्गखोल्या व परिसराची उत्कृष्टपणे सजावट करण्यात आली. सौ.लीना चितळे व मुख्याध्यापिका विद्या टोणपे यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत  केले.
विद्यार्थ्यांचे सॅनीटायझर करून टेंपरेचर चेक करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्यासह सर्व पदाधिका-यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.चिमुकले विद्यार्थी व पालकांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण होते.यापूर्वी टप्प्याटप्प्याने इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंत शाळा सुरू करण्यात आली होती.शाळेकडून कोरोना संसर्गाबाबत सरकारी नियमानुसार योग्य उपाय योजना व दक्षता घेण्यात आली आहे.
To Top