Sanvad News साहित्यिक बाबासाहेब परीट यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाकडून ध्वनीचित्र मुद्रणासाठी निमंत्रण

साहित्यिक बाबासाहेब परीट यांना महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाकडून ध्वनीचित्र मुद्रणासाठी निमंत्रण

बिळाशी तालुका शिराळा येथील ग्रामीण कथाकार,साहित्यिक बाबासाहेब परीट यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या वतीने किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मान्यवर साहित्यिकांच्या ध्वनीचित्र मुद्रणासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे.         

 बाबासाहेब परीट हे शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भाटशिरगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.२००६-२००७ साली त्यांची बालभारतीवर स्वाध्यायपुस्तिका निर्मिती साठी निवड झाली होती.इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीवेळी समीक्षक म्हणूनही त्यांनी उत्कृष्टरित्या कामकाज केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने  सांगली,पुणे,ठाणे,डोंबिवली, चिपळूण येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कथाकार म्हणून कथाकथन केले आहे. 

 नाशिक येथे होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठीही त्यांना निमंत्रित केले आहे.सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनातही बाबा परीट यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. 

एक लाडू गरिबासाठी, होळी लहान करा पोळी दान करा, फटाके मुक्त दिवाळी, विद्यार्थ्यांसाठी लेखन कार्यशाळा, विद्यार्थी साहित्य संमेलन चळवळीमध्ये भरीव योगदान दिले आहे.या निवडीबद्दल बाबासाहेब परीट यांचे शिक्षण,साहित्य,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून  अभिनंदन होत आहे.

To Top