मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सेकंडरी स्कूल भिलवडी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक गिरीश चितळे,राजूदादा पाटील,डी.के.किणीकर,डॉ.सुनिल वाळवेकर,जयंत केळकर,संजय कदम,माळवाडी गावच्या सरपंच सुरैय्या तांबोळी,प्रा.मनिषा पाटील,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्मिता माने,प्रकाश गोसावी बालवाडीच्या सुचेता कुलकर्णी आदींसह सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
संस्था सचिव संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले,शशिकांत उंडे यांनी पाहुणे परिचय, संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा.महेश पुजारी यांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे निवेदन केले.सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडीच्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी आभार मानले.