Sanvad News जिल्हा परिषद शाळा सावंतपुर वसाहत येथे बालदिन विविध उपक्रमांनी साजरा..

जिल्हा परिषद शाळा सावंतपुर वसाहत येथे बालदिन विविध उपक्रमांनी साजरा..



जिल्हा परिषद शाळा सावंतपुर वसाहत येथे 14 नोव्हेंबर 2021 रविवार रोजी मोठ्या उत्साहात पंडित जवाहरलाल नेहरू अर्थात सर्वांचे लाडके चाचा नेहरू यांचा जन्मदिवस म्हणजेच बाल दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका बिना माने मॅडम, तसेच सुधा सुतार मॅडम, मॅडम सुवर्णा सावंत मॅडम ,मीनाक्षी सुतार मॅडम ,नंदाताई पाटील मॅडम पुष्पाराजे मॅडम, प्रीती बुरले मॅडम व मेघा चव्हाण मॅडम शितल पाटील मॅडम, धनंजय साळुंखे सर व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाकरिता शाळेतील बालचमू चाचा नेहरू यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. तसेच सर्वप्रथम प्रीती बुरले मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजीमधून केले. 


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इयत्ता चौथीचे विद्यार्थी प्रतिनिधीने भूषवले होते. विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर इयत्ता पहिली दुसरी तिसरी व चौथी च्या खूप विद्यार्थ्यांनी आपले मनोगत चाचा नेहरू यांच्या विषयी माहिती सांगून आपल्या भाषणातून सादर केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुधा सुतार मॅडम यांनी पंडित नेहरू यांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर आभार प्रदर्शन झाले मेघा चव्हाण मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले त्यानंतर आमच्या जिल्हा परिषद शाळा सावंतपूर वसाहत शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय साळुंखे सर यांनी मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पाडला. अशाप्रकारे अतिशय उत्साही वातावरणात जिल्हा परिषद​ शाळा सावंतपुर वसाहत येथे आनंदी अशा वातावरणात सोबत बाल दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
To Top