Sanvad News सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.


भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी या विद्यालयाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक दादासो चौगुले  व प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक धनंजय पाटील उपस्थित होते. 
आदर्शांची प्रेरणा घेऊन यशाची शिखरे सर करा.आपली ध्येये मोठी ठेवा व ती साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करा असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. आई-वडील गुरुजनांचा आदर करा,आरोग्य निरोगी ठेवा असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो चौगुले यांनी व्यक्त केले.
पारितोषिकांचे वितरण प्रमुख पाहुणे धनंजय पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार यांनी तर पाहुणे परिचय उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी केला. पारितोषिक वितरणाचे निवेदन राजीव आरते यांनी केले.सूत्रसंचालन अशोक नलावडे यांनी तर आभार पर्यवेक्षक संभाजी माने यांनी मानले. यावेळी  उच्च माध्यमिक विभाग प्रमुख जी.एस. साळुंखे,सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
To Top