मे.बी.जी.चितळे डेअरीचे पार्टनर व भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक उद्योजक गिरीश चितळे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने भिलवडी शिक्षण संस्थेस दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयाची देणगी दिली.शिक्षण संस्थेचे विश्वस्त नानासाहेब चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यक्ष विश्वास चितळे,उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी देणगीचा स्वीकार केला.
स्वत:च्या वाढदिनी कोणताही कार्यक्रम साजरा न करता ते भिलवडी शिक्षण संस्थेस देणगी देतात.वाढदिवसाच्या अंकात एक लाख रुपये मिळवून ती रक्कम देणगी म्हणून दिली जाते.गेल्या सात वर्षांपासून त्यांनी ही परंपरा सुरू केली आहे.२४ नोव्हेंबर रोजी त्यांचा ४९ वा.वाढदिवस.त्यांनी १ लाख ४९ हजार रुपये देणगी दिली.तसेच स्व. काकासाहेब चितळे यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांनी एक लाख रुपये अशी एकूण दोन लाख एकोण पन्नास हजार रुपयाची देणगी दिली.
यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,काकासाहेब चितळे यांनी वाढदिवसाच्या निमित्त सामाजिक जाणिवेतून शिक्षण संस्थेस देणगी देण्याची परंपरा निर्माण केली आहे.या निधीचा वापर शिक्षण संकुलात अत्यावशक सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी केला जावा.
या देणगी बद्दल डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्या हस्ते बुके देऊन गिरीश चितळे यांचे संस्थेच्यावतीने अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक डी.के. किणीकर, डॉ.सुनिल वाळवेकर,व्यंकोजी जाधव,जयंत केळकर,सचिव संजय कुलकर्णी,मानसिंग हाके,के.डी.पाटील,डॉ.दिपक देशपांडे,शुभांगी मन्वाचार,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे आदी उपस्थित होते.