Sanvad News पुस्तके माणसाला जगण्यासाठीचे बळ देतात - मारुती शिरतोडे ;पलूसकर विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

पुस्तके माणसाला जगण्यासाठीचे बळ देतात - मारुती शिरतोडे ;पलूसकर विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा


पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जनसेवा वाचनालय वाझर चे संस्थापक अध्यक्ष ,साहित्यिक मारुती शिरतोडे , मुख्याध्यापक टी.जे.करांडे ,मराठी विभाग प्रमुख अनिल बामणे,अशोक पवार,मिलिंद शिरतोडे, गजानन पाटील,सुनील पुदाले, सौ.प्रिती नरुले,सौ. सुनिता कोळी, सौ.स्मिता साळुंखे सर्व शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
कु. प्रज्ञा ऊनऊने,कु. सिद्धी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात भाषा विषयक विद्यार्थ्यांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा बाळासाहेब चोपडे यांनी करून दिला. सुरुवातीला ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. भाई एन.डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


यावेळी मारुती शिरतोडे म्हणाले अनेक लेखकांनी कवींनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. आपल्या भावना कल्पना विचार एकमेकापर्यंत पोहोचण्यासाठी भाषा हे महत्त्वाचे साधन आहे.पुस्तके माणसाच्या जगण्याला बळ देतात, विद्यार्थ्यांनी शालेय वयात अभ्यासाबरोबरच वाचनाला महत्त्व द्यावे.

मराठी साहित्यामध्ये अनेक पुस्तकांचा खजिना आहे. नामवंत साहित्यिकांनी आपल्या लेखणीने मराठी भाषा समृद्ध केलेली आहे.मराठीसाठी मराठी माणसाने गतिशील राहिले पाहिजे तरच मराठी गतिशील राहील. मराठी जागतिक भाषा होत आहे. जगातून नवे शब्द स्वीकारणे, स्वत:ची अभिव्यक्ती अधिक समृद्ध करणे हे काम करावे लागणार आहे.आपल्या मनोगतातून महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांची ओळख करून दिली.विविध कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

मुख्याध्यापक टी.जे.करांडे म्हणाले विद्यार्थ्यांनी दररोज जास्तीत जास्त मराठी शब्दाचा वापर करावा. मराठीमध्ये समृद्ध असे ज्ञान भांडार आहे या ज्ञान भांडाराचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा. वाचनप्रेमी असावे अशी अपेक्षा व्यक्त केली.मराठी भाषेच्या डोळस वापराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता प्रतिपादित केली,
सुञसंचालन सुनिल पुदाले यांनी आभार अनिल बामणे यांनी मानले.
To Top