भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थेच्या विविध शाखांमधील गुणवंत विद्यार्थी,खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.कोरोनाचे संकट लवकर टळून पूर्वीप्रमाणे शाळा सुरळीत सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करीत विश्वास चितळे यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक गिरीश चितळे,डी.के. किणीकर,जयंत केळकर,व्यंकोजी जाधव,प्रा.धनंजय पाटील,संस्थेचे सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील,संजय कुलकर्णी,प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे, सौ.शुभांगी मन्वाचार,संभाजी माने,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी आदींसह बाबासाहेब चितळे महाविद्यालय,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी,इंग्लिश मिडीयम स्कूल,इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल,खाजगी मराठी प्राथमिक शाळा, डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी आदी शाखांमधील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.

शशिकांत उंडे यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाचे नियोजन केले.निलेश कुडाळकर यांनी संविधान उद्देशिकेच वाचन केले.संजय मोरे यांनी सूत्रसंचालन केले.