Sanvad News खाजगी मराठी प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.

खाजगी मराठी प्राथमिक शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी व हुतात्मा दिन भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घर परिसराची स्वच्छता करणे,महात्मा गांधीजींची भजने,प्रार्थना यांचे गायन केले.रविवार दिनांक ३० रोजी विद्यार्थ्यांनी घरातील स्वतःची कामे स्वतः करून उत्कृष्ट कृतीचे सादरीकरण केले.यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ.छाया गायकवाड,संध्यारानी भिंगारदिवे,प्रगती भोसले,शरद जाधव,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे,
किरण गुरव,सफुरा पठाण,रुक्सानाशेख, स्वाती भोळे,रुकैय्या पटेल आदी शिक्षक उपस्थित होते.
To Top