हुतात्मा दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये परिसर स्वच्छता,वृक्षारोपण, प्रार्थना भजन,व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इयत्ता ११ वीची विद्यार्थिनी कु. प्रज्ञा दीपक सावंत ,सौ.पी.व्ही.नरुले मँडम यांनी अतिशय सुंदर भजने सादर केली. कस्तुरबा गांधी महात्मा गांधी यांच्या वेषातील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी बोलताना प्रा.बी.एन. पोतदार म्हणाले गांधीजींनी सत्य अहिंसा प्रेम स्वच्छता स्वावलंबन स्वदेशी या विचारांचा पाईक म्हणून त्यानी आपला जीवन मार्ग अवलंबला. महात्मा गांधीजींच्या साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सत्शील व निरिच्छ वृत्ती आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे अनेकांचा त्यांनी विश्वास संपादिला असे सांगितले.
सूत्रसंचालन एस.एस. पुदाले यांनी आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी.चोपडे यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्ष उदय परांजपे व उपाध्यक्ष विश्वास रावळ,सचिव जयंतीलाल शहा व सर्व संचालक यांनी सर्व उपक्रमाचे कौतुक केले.