Sanvad News तनुष्का पाटीलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

तनुष्का पाटीलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.


येळावी (ता.तासगाव) येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर 2 येळावी शाळेची विद्यार्थिनी तनुष्का विकास पाटील हिने इ.५वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 250गुण (83.33%) मिळवून सांगली जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत 65 वे स्थान पटकावले. तिला वर्गशिक्षक आनंदराव उतळे, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.
     तासगाव पंचायत समिती सदस्य उमेश(दादा)पाटील, ग्रा.पं.येळावीच्या सरपंच वनिता जाधव,उपसरपंच रवींद्र सूर्यवंशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी, गटशिक्षणाधिकारी डॉ. सुरेश माने, शिक्षण विस्तार अधिकारी गीता शेंडगे,येळावी केंद्रप्रमुख गजानन दौंडे आदींनी तिचे या उज्जवल यशाबद्दल अभिनंदन व सत्कार केला.
To Top