Sanvad News सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये महात्मा गांधींना अभिवादन.

सेकंडरी स्कूल भिलवडी मध्ये महात्मा गांधींना अभिवादन.


भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
 याप्रसंगी संस्थेचे सचिव मानसिंग हाके, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने, पंचायत समिती शिक्षण विभाग विषय तज्ञ धनंजय भोळे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय मोरे यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा, सत्याग्रह व स्वातंत्र्य चळवळ या विषयावर विचार व्यक्त केले. स्वातंत्र्य लढ्यात सर्व भारतीयांनी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसक मार्गाने सत्याग्रह करुन ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य देण्यास भाग पाडले. या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशी माहिती देण्यात आली. 
यावेळी संस्थेचे सह सचिव के. डी पाटील, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख जी. एस साळुंखे, सौ. मनिषा पाटील, व्ही. एस. तेली, के. आर पाटील, प्रमोद काकडे, शिवाजी कुकडे, वरिष्ठ लेखनिक पांडुरंग सुर्यवंशी, सर्व शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेत्तर सेवक उपस्थित होते.
To Top