सेकंडरी स्कूल भिलवडी प्रशालेच्या इमारत नुतनीकरण कामाचा शुभारंभ
Admin
February 12, 2022
भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भिलवडी या विद्यालयाच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व नूतनीकरणाविषयी थोडक्यात माहिती दिली. कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टर अनिल जाधव व त्यांचे चिरंजीव यांच्याकडे इमारत नूतनीकरण काम देण्यात आल्याचे सांगितले .विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक शशिकांत उंडे यांनी या कामासाठी पंचवीस हजार रुपयांची देणगी दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे , संस्थेचे विश्वस्त जे. बी. चौगुले ,संचालक डॉ. सुनील वाळवेकर , डी. के.किणीकर, संजय कदम तसेच प्राचार्य देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी , पर्यवेक्षक संभाजी माने, सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संस्था सहसचिव के.डी.पाटील यांनी मानले.