Sanvad News मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आमणापूर गावची शर्वरी कोरे बनली सी.ए.

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आमणापूर गावची शर्वरी कोरे बनली सी.ए.


मुलांचे करियर घडविण्यासाठी त्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवायच की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायच यावरून सध्या पालकांचा गोंधळ सुरू आहे.मात्र शिक्षणात येणारा भाषेचा अडसर दूर करीत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत शिकलेली आमणापूर ता. पलूस गावातील विद्यार्थीनी कु.शर्वरी आप्पासाहेब कोरे हिने सी. ए.(सनदी लेखापाल)च्या परीक्षेत यश मिळवून सांगली जिल्ह्यातील पहिल्या पहिल्या आलेल्या नऊ गुणवान विद्यार्थिनी मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तिच्या या यशाबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थी तिच्या घरी अभिनंदन करण्यासाठी येतात. ताई तुला कसे यश मिळाले याबद्दल विचारतात तेव्हा ती भरभरून माहिती सांगत असते.भाषा हे एक ज्ञानाचे माध्यम आहे.आपण कोणत्या माध्यमात शिक्षण घेतो याही पेक्षा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करता येतात.आणि माझे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले असल्याचा आज मला अभिमान वाटत असल्याचे ती सांगते.
 शर्वरीचे वडील आप्पासाहेब कोरे हे क्रांती कारखान्याचे सचिव तर आई बसवेश्वर पतसंस्थेच्या कॅशिअर आहेत.शर्वरीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा आमणापूर, ल.कि.विद्यामंदिर पलूस येथे माध्यमिक शिक्षण, गणपतराव आरवाडे कॉलेज, सांगली मध्ये बारावी केली. त्यानंतर सीए प्रवेश परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर  पुण्यात सीएचे क्लास केले व नऊ महिन्यांनी इंटरमीजीएट परिक्षा दिली. त्यानंतर  एस एस पैलवान चार्टड अकांऊटंट याच्याकडे तीन वर्षे आर्टीकलशीप केली. त्यानंतर अंतिम परिक्षा, त्याचसोबत मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातून बी.कॉम.पूर्ण केले.
स्मार्ट फोन आपली गरज बनला असला तरीही आपणास त्याचा वापर अत्यावश्यक गरजेपुरता करता आला पाहिजे.अभ्यास करताना प्रश्न उत्तर रेकॉर्ड करून ती परत परत ऐकल्याचा फायदा झाला.अभ्यासात एकाग्रता वाढण्यासाठी ध्यानधारणा केली.अठरा ते चोवीस हे स्वतःला सिद्ध करण्याचे वय असून या कालावधीत घेतलेल्या कष्टांचे परिणाम आयुष्यभर दिसून येतात.त्यामुळे योग्य संगत,वेळेचा सदुपयोग करीत मित्र परिवा सोबत प्रॉडक्टीव टॉक तसेच स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क या दोन्ही पद्धतीने अभ्यास केला असल्याचे तिने सांगितले.
शर्वरीच्या या यशाबद्दल पुणे विभागाचे पदवीधर आमदार मा.अरुण (आण्णा)लाड,जिल्हा परिषद सदस्य शरद लाड,वैभव उगळे,सुरेश पाटील,कोळेकर महाराज यांच्या हस्ते शर्वरी चा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
To Top