Sanvad News लेकरांनो चंदन तस्कर पुष्पाचा नव्हे.. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळयासमोर ठेवा - आष्पाक आत्तार सरांचा फळा विद्यार्थ्यांशी बोलू लागला..!

लेकरांनो चंदन तस्कर पुष्पाचा नव्हे.. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळयासमोर ठेवा - आष्पाक आत्तार सरांचा फळा विद्यार्थ्यांशी बोलू लागला..!


गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट पुष्पा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असून युवा पिढी पुष्पा या चंदन तस्करी करणाऱ्या अभिनेत्याच्या  प्रेमात पडली आहे. त्याचे डायलॉग आणि त्याची चाल तरुणाई पासून आता शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.पुष्पा हा एक चंदन तस्कर आहे हे माहित असणारे आणि नसणारे विद्यार्थीही पुष्पा चा आदर्श घेवू लागल्याचे चित्र आहे. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन पुष्पा हा एक चंदन तस्कर आहे, तरुणाचा तो आदर्श होऊ शकत नाही, त्याचा आदर्श घेतला तर काय होईल,आदर्श कोणाचा घ्यायला पाहिजे, याबाबत जनजागृती करणारी कविता शेरे (ता. कराड) येथील सद्गुरू आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक  आष्पाक आत्तार यांनी सुंदर हस्ताक्षर मध्ये शाळेच्या  फलकावर लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. 
आकर्षक रंगसंगती, सुंदर हस्ताक्षर आणि मोलाचा आणि अचूक संदेश  यामुळे सोशल मीडियावर या फलक लेखनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून समाजातील विद्यार्थ्यांसह तरुणाईसाठी हा संदेश मोलाचा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.पोलिसांवर गोळ्या झाडत पळणाऱ्या चंदन तस्कर पुष्पाचा आदर्श घेण्यापेक्षा तरुणांनी शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा या उद्देशाने  काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेली अज्ञात कवीची पुष्‍पा विषयी जनजागृती करणारी कविता 
कोण कुठला पुष्पा, चंदन तस्करी करतो, त्यान दाखवलेला अविर्भाव, तुरुणाईला वेड लावतो. उद्या तरणी पोरं पोलिसांवर गोळ्या झाडतील, कायदा आणि व्यवस्थेच्या पार चिंध्या उडवतील, स्मगलर अन् दलाल तरुणाईचे आयडॉल होतील, आदर्श जीवन जगणारे हद्दपार होतील. अनुकरण कोणाचे करायचे भान राखलं पाहिजे,आदर्श आणि चारित्र्य जीवापाड जपलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तरुणाईचे आदर्श ठरावेत,भारताच्या भूमीत हजारो भगतसिंग निपजावेत,भारत मातेच्या रक्षणाची शपथ आज घेऊया, वाकड्या मानेच्या फेगड्या पायाच्या पुष्पाला हद्दपार करूया...
 ही कविता सुंदर हस्ताक्षरात लिहून विद्यार्थ्यांसह तरुणाईचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.अत्तार यांनी यापूर्वी कोरोना विषयी जनजागृती करणारा फलक, पर्यावरण जागृतीसाठी केलेली बोलकी झाडे, पक्षी संवर्धनासाठी राबवलेले उपक्रम समाजासाठी आदर्श ठरले आहेत.

त्याचप्रमाणे नुकताच पुष्पा विषयी विध्यार्थ्यांना लेखनाच्या माध्यमातून दिलेला अनोखा संदेश विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणारा ठरेल अशी आशाब शिक्षण वर्तुळातून व्यक्त होत आहे. या फलक लेखनामुळे शेरे गावासह परिसरातून तसेच सोशल मीडियावर अज्ञात कवीने लिहिलेल्या या कवितेचे ,शाळेचे तसेच शिक्षक आष्पाक आत्तार यांचे कौतुक होत आहे.

To Top