भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये इयत्ता १ ली ते ४ थी मधील स्पर्धा परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांची पालकसभा संपन्न झाली.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,संजय कदम,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा संपन्न झाली.
प्राथमिक स्तरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास चांगले यश मिळते.शिक्षकांच्या सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांनीही योगदान देणे गरजेचे आहे. संस्था पातळीवर स्वतंत्र स्पर्धा परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकांशी संवाद साधताना डी.के.किणीकर यांनी दिली.
मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले.कोल्हापूर जिल्हा इलेक्ट्रीकल इन्स्पेक्टर व शाळेचे पालक प्रतिनिधी सुनिल देसाई यांनी शाळेने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगून सर्व पदाधिकारी,शिक्षक,पालक,विद्यार्थी यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी शाळा स्तरावर राबविल्या जाणाऱ्या नियोजना विषयी सविस्तर माहिती दिली.यावेळी प्राथमिक शाळा स्तरावरील विविध विषयांवर संस्था प्रतिनिधी,शिक्षक व पालक यांच्यामध्ये चर्चा करण्यात आली.
प्रास्ताविक व स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केले तर आभार ज्येष्ठ शिक्षिका सौ. छाया गायकवाड यांनी मानले.यावेळी संध्याराणी भिंगारदिवे,प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे,किरण गुरव, सफुरा पठाण, रुक्साना शेख,रुक्कैय्या पटेल,स्वाती भोळे आदी शिक्षकांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.