Sanvad News उद्योजक मकरंद चितळे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस पन्नास हजाराची देणगी; वाढदिनी देणगी देण्याची चितळे परिवाराची परंपरा.

उद्योजक मकरंद चितळे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस पन्नास हजाराची देणगी; वाढदिनी देणगी देण्याची चितळे परिवाराची परंपरा.


चितळे उद्योग समूहाचे संचालक मकरंद दत्तात्रय चितळे यांनी भिलवडी शिक्षण संस्थेस पन्नास हजार रुपयांची देणगी दिली.मकरंद चितळे यांनी त्यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त भिलवडी शिक्षण संस्थेस ही देणगी दिली.
आपला वाढदिवस साध्या व विधायक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा चितळे परिवाराने निर्माण केली आहे.आपल्या वाढदिवसाच्या संख्येपेक्षा जादा रक्कमेची देणगी चितळे परिवारातील सदस्य भिलवडी शिक्षण संस्थेस देतात.

संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असणाऱ्या शैक्षणिक व भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे.मकरंद चितळे यांनी सदर देणगीचा धनादेश संस्थेच्या पदाधिऱ्यांकडे दिला.संस्थेच्या वतीने बुके देवून वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संचालक डी.के. किणीकर, जयंत केळकर,संस्था सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील,आजीव सदस्य एम. आर. पाटील,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,इंग्लिश प्रायमरी व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे आदी उपस्थित होते.



To Top