राज्यस्तरीय माॅडेल स्कूल असणाऱ्या धनगाव ता.पलुस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अत्याधुनिक स्वरूपातील विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अटलस काॅपको इंडिया लि. यांचे सौजन्याने व इंटरनॅशनल असोसिएशन फाॅर ह्युमन व्हॅल्युज यांचे द्वारा निर्मित सायन्स लॅब चे उद्घाटन पलूस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांचे हस्ते व गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाला इंटरनॅशनल असोसिएशन फाॅर ह्युमन व्हॅल्युज संस्था विभागप्रमुख श्रीम.मेघा झेंडे मॅडम यांचे मार्गदर्शन केले.सायन्स लॅब च्या माध्यमातून विद्यार्थी यांना विज्ञानाची आवड व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती साठी सायन्स लॅब महत्वाचे आहे.सदर लॅब विद्यार्थी यांना उपयुक्त ठरेल असे मत उद्घाटन वेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले .
सायन्स लॅब प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत समाधान शिंदे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.प्रशिक्षणास जि.प .शाळा पलूस नं.1, नेर्ले, कापूसखेड ,ऐतवडे बुद्रुक, तानंग शाळेतील शिक्षक उपस्थित होते. त्यांना प्रयोगशाळा साहित्य वापराचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन मिळाले. यावेळी माधुरी गुरव शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पलूस ,धनगाव चे सरपंच सतपाल साळुंखे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.श्रावणी साळुंखे,शिक्षण विभागाचे सागर कदम,श्री.बन्ने सर संदीप यादव, हणमंत यादव,संजय मोहिते,दत्तात्रय उतळे, सुनील भोसले, सुधीर साळुंखे,रविंद्र साळुंखे,माणिक तावदर,दिलीप मोहिते, सुनील मोहिते तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री.संजय डोंगरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले,संयोजन श्री. अजित जाधव , श्रीम.मनिषा चव्हाण,सौ.सीमा चौगुले , रेश्मा गुरव,साळुंखे यांनी केले,आभार श्री.विजय धेंडे यांनी मानले.