Sanvad News प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार

प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार


भिलवडी - भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात सांगली जिल्हा परिषदेचे नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा भिलवडी शिक्षण संस्था व सर्व विभागांच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
अपार मेहनत, कष्ट, जिद्द, चिकाटी, नियमितता यांमुळे यश मिळवता येते.परिस्थितीवर मात करून यशाची शिखरे गाठता येतात. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत शाळा,गुरूजन,आई-वडील यांचा  मोलाचा वाटा असून त्यांच्यावर श्रद्धा ठेवा प्रतिपादन शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त जे. बी चौगुले, संचालक डी.के.किणीकर, जयंत केळकर, संजय कदम, व्यंकोजी जाधव, सह सचिव के. डी पाटील, मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे, मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, सौ.विद्या टोणपे,अजिव सदस्य महेश पाटील, मनीषा पाटील विजय तेली, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक  संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केले. संजय मोरे  यांनी सूत्रसंचालन केले तर  मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी आभार मानले.


To Top