Sanvad News इंग्लिश मिडीयम स्कूल भिलवडी मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

इंग्लिश मिडीयम स्कूल भिलवडी मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात


भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, भिलवडी मध्ये सोमवार  दि. २८/०२/२०२० रोजी मराठी भाषा गौरव दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.के.जी.सेक्शन मधील ज्युनिअर के.जी. व मिनी के. जी. मधील सर्व मुले पारंपारिक वेशभूषेत आली होती तसेच  मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन केले होते. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध लोकगीते सादर करण्यात आली. यावेळी पालकांनी या  उपक्रमांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने टिचर , सर्व शिक्षक वृंद व सेवक उपस्थित होते.




To Top