अँग्रोन्युज परिवार फलटण आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीत संमेलनात कवयित्री मनीषा रायजादे-पाटील यांच्या "काव्यमनीषा" कवितासंग्रहास "उत्कृष्ट साहित्य सेवा पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निबाळकर , आमदार मा. दिपकरावजी चव्हाण व प्राचार्य विश्वासराव देशमुख,फलटण एज्युकेशनच्या ट्रस्टी मा .वसुंधरा नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संयोजक मा.प्रकाश सस्ते, मा.विजय काकडे ,मा. प्रभाकर पवार व संयोजन समितीच्या खुपच सुंदर दिमाखादार सोहळ्यात हा सन्मान देण्यात आला .
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,मिरज येथे त्या शिक्षिका पदी कार्यरत आहेत. आतापर्यंत कवयित्री ,गझलकार मनीषा रायजादे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार व राष्ट्ररत्न पुरस्कार, नॅशनल युनिटी अवॉर्ड ,कस्तुरबा गौरव पुरस्कार, ज्ञानवर्धिनी पुरस्कार,आदर्श आध्यापिका पुरस्कार असे अनेक शैक्षणिक, साहित्यिक ,सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच त्या अनेक साहित्यिक संस्था पदावर कार्यरत आहेत.