Sanvad News भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

    

 भिलवडी शिक्षण संस्थेची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली  उत्साहात संपन्न झाली.कोविड नियमावलीचे पालन करीत  आॅनलाईन पद्धतीने ही सभा घेण्यात आली.
प्रारंभी अहवाल काळात निधन झालेले संस्थेचे माजी पदाधिकारी, देणगीदार, सभासद यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन करून अहवाल सालात संस्थेने केलेल्या कामकाजाविषयी माहिती सादर केली.सभासदांनी विचारलेल्या विविध  प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देत शंकांचे समाधान केले. संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी संस्थेच्या भविष्यकालीन योजनां विषयी  मार्गदर्शन केले.अंदाज
 पत्रकास मंजूरी, लेखापरीक्षकाची नेमणूक आदी बाबींसह विविध विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.यावेळी उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,संस्थेचे विश्वस्त नानासाहेब चितळे,जे.बी.चौगुले, डॉ.सुहास जोशी,संस्थेचे संचालक डॉ.सुनिलवाळवेकर,संजय कदम,डी.के.किणीकर,जयंत केळकर, व्यंकोजी जाधव,प्रा.आर.डी.पाटील,सहसचिव के.डी.पाटील,सर्व आजीवसदस्य, विभाग प्रमुख आदींसह सभासद उपस्थित होते.
To Top