Sanvad News भिलवडी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन.

भिलवडी इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन.


भिलवडी शिक्षण संस्थेच्याइंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी,मध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला.
इंग्लिश प्रायमरी अँन्ड हायस्कूल मध्येस्वातंत्र्यवीर सावरकर पुणयतिथी व कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. हा मराठी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या गौरव दिनाचे औचित्य साधून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी कविता ,भाषणे , गीत, नाटक ,मूकनाटय, नृत्य, पोवाडा असे अनेक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के.जी. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने व अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ९ वी तील अभिमन्यू खोत या विद्यार्थ्याने केले, कार्यक्रमाचे नियोजन सौ. मनिषा तेली मॅडम, सौ.सारिका पाटील मॅडम व श्री सुनील ऐतवडे सर यांनी केले. इयत्ता नववीतील विद्यार्थी ओंकार जाधव यांनी कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.
To Top