विध्यार्थ्यानी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनावे. आपलें स्वप्न साकार करण्यासाठी विध्यार्थी दशेतच आपलें ध्येय निश्चित करावे, असे आव्हान सांगली जिल्हा शिक्षक संघांचे जिल्हा उपाध्यक्ष मा. बसवराज येलगार यांनी व्यक्त केले.
ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय गुळवंची येथील ईयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांच्या निरोप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गुळवंची गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. रावसाहेब खरात होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा. खुटाळे सर यांनी केले.त्यांनी विध्यार्थ्यांना आपले आईवडील आणि घरातील वृद्ध व्यक्ती यांची प्रतिष्ठा जपावी असे आव्हान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आदिती संभाजी खरात हिने केले.अनेक विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त करून शाळेतील जुन्या आठवणीना उजाळा दिला.
शेवटी आभार प्रदर्शन श्री. गुरव सर यांनी मानले.कार्यक्रमास श्री. बाबर सर,शिवाजी पाटील सर,दिगंबर गोरे, चंदू पवार, अजय देसाई, इत्यादी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.