Sanvad News जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरबन येथे महिलादिन साजरा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरबन येथे महिलादिन साजरा.




जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरबन येथे ८ मार्च२०२२ रोजी जागतिक महिला दिन जिल्हा परिषद शाळा बोरबन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ महिला संध्याराणी गायकवाड व उज्वला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर मुख्याध्यापक श्री राजेंद्र कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महिला दिनाची पार्श्वभूमी ,सद्यस्थिती सांगितली .नंतर शाळेतील सहाय्यक शिक्षक स्मिता पाटील यांनी महिला दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले .नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य व पोवाडा सादर केला .तसेच पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्यामध्ये उखाणे स्पर्धा ,संगीत खुर्ची व फनी गेम्स घेण्यात आले. गावातील महिलांनी कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेतला.विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे वितरण करण्यात आली.यावेळी बोरबन आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
   याप्रसंगी श्री जालिंदर मोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तसेच सर्व सदस्य जेष्ठ महिला सर्व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन स्मिता पाटील मॅडम यांनी केले.
To Top