Sanvad News गणेशनगर दुधोंडी शाळेत महिलांचा सन्मान.

गणेशनगर दुधोंडी शाळेत महिलांचा सन्मान.

जिल्हा परिषद शाळा गणेशनगर दुधोंडी तालुका पलूस येथील प्राथमिक शाळेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणेत आले.

आदर्श शिक्षक सुनिल गुरव म्हणाले स्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले, राजमाता जिजामाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर  , रमाबाई आंबेडकर  या सर्व  आदर्शाचा  वारसा जोपासत आहेत . महिला आज सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रेसर असून या संपूर्ण महिलांचा आदर व सन्मान या निमित्त होत आहे.

 ग्रामपंचायत सदस्य अंजली भोसले यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व महिलांना अंजली भोसले यांच्या हस्ते व उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते गुलाब पुष्प व खाऊ देऊन सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पल्लवी साळुंखे ,सीमा इंगळे, अश्विनी भोसले ,शोभा माने ,सविता जाधव ,सुनिता भोसले ,श्रेया रणखांबे, अमृता सनके,  काजल  सनके, प्रमुख महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास भोसले ,मार्गदर्शक रामचंद्र भोसले ,सदस्य मिलिंद जाधव, सोनाप्पा  गेजगे ,  रवींद्र सनके ,   उपस्थित होते.

 स्वागत प्रास्ताविक सुनिल गुरव यांनी केले तर आभार नौशाद शेख सर यांनी मानले.

To Top