शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योग व व्यावसायिक क्षेत्रात उतरावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षण परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी केले.श्री सिध्देश्वर हायस्कूल तुरची या शाळेतील इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी ते बोलत होते.
यापुढे बोलताना कटारे म्हणाले की,आईवडिलांचे प्रेम,तुमच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व ज्या शाळेने तुम्हास घडविले त्यास कधीच विसरून नका. कार्यक्रमाच्या निमिताने महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब कटारे सर यांची पुणे विभागीय संघटक पदी निवड झाल्याबद्दल श्री. सिध्देश्वर हायस्कूल तुरची येथे त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीसिद्धेश्वर हायस्कूल तुरचीचा संपूर्ण स्टाफ व संस्थेचे संचालक, येळावी केंद्राचे केंद्रप्रमूख मा. गजानन दौंडे सर... मा. मुख्याध्यापक मा.श्री. लक्ष्मण पाटील सर, मा. किरण काळेबाग सर, मा. विजय खोत सर, मा. गौतम निर्मळे सर, मा.विष्णू पवार सर, मा.सुरेश गावित सर, मा. कृष्णत खबाले सर ,मा. दिपक बोबडे सर, मा.उमेश गुरव सर, मा. शशिकांत पाटीत सर, मा. शरद पाटील सर,,श्रीमती. मेघा थोरात मॅडम, सौ. निलम पाटील मॅडम, सौ. संगिता सातपुते मॅडम, सौ. सोनम पाटील मॅडम, सौ. सुजाता पाटील मॅडम व शाळेतील सर्व विदयार्थी इत्यादी मोठया संख्येने उपस्थित होते.