Sanvad News कलाशिक्षक विजयकुमार शिंगण राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित .

कलाशिक्षक विजयकुमार शिंगण राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित .

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री.म्हाळसाकांत विद्यामंदिर पाल,तालुका-कराड, जिल्हा- सातारा येथील कलाशिक्षक श्री विजयकुमार पांडुरंग शिंगण यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक शैक्षणिक संस्था ओझर्डे, तालुका वाई यांच्या वतीने राज्यस्तरीय  महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेमार्फत या पुरस्कार प्रदान करण्यात आला.जोशी विहीर येथील शानदार सोहळ्यामध्ये सातारा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरचे  सहसचिव प्रशासन डॉ राजेंद्र शेजवळ,माजी शिक्षण सभापती उत्तमराव माने ,संस्थेचे अध्यक्ष सुनील फरांदे यांच्या उपस्थितीत कला शिक्षक विजयकुमार शिंगण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कलाशिक्षक विजय शिंगण यांनी गेली १५ वर्षे शैक्षणिक क्षेत्र मध्ये केलेल्या कामाबरोबरच,जगविख्यात रांगोळी शिवराज्याभिषेक साकारून   वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली.तसेच सामाजिक हेतू लक्षात घेऊन रांगोळीतून समाजप्रबोधन, दुष्काळग्रस्त व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभा करून नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.


त्याच बरोबर आपल्या कलेच्या जोरावर  समाजातील विविध घटकांशी संपर्क साधून विद्यालयाचे सुशोभीकरण करण्यासाठी कोरोना च्या   काळामध्ये केलेल्या कामातून समाजामध्ये जागृती निर्माण केली. तर कोरोना हा आजार किती भयानक आहे त्यासाठी जनजागृती करता रस्त्यावरती फलक लेखन करून समाजजागृती केली. गड संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून गडावरील विविध मोक्याच्या ठिकाणी रेखाटन व संदेश पर पोस्टर ची निर्मिती करून समाजजागृतीचे काम शिंगण यांनी केले आहे. त्याचबरोबर विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील राहून त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये मदत करण्याचे काम केले. अशा या कलावंता चा सन्मान करण्यात आला. 
शिंगण यांच्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अभय अभयकुमार साळुंखे, सचिवा शुभांगी ताई गावडे सहसचिव प्रशासन डॉ राजेंद्र शेजवळ, सहसचिव अर्थ सिताराम गवळी, आजीव सेवक श्रीराम साळुंखे, व्यवस्थापक मंडळाचे सदस्य महेश गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. पाचुपते, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी पाल व पाल पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



To Top