Sanvad News तरच, गुरुजी आनंददायी शिक्षण देऊ शकतील .? - शिक्षकनेते संभाजीराव थोरात यांची मागणी;शिक्षक संघाच्या पनवेल येथील अधिवेशनात तात्यांची तुफान फटकेबाजी..

तरच, गुरुजी आनंददायी शिक्षण देऊ शकतील .? - शिक्षकनेते संभाजीराव थोरात यांची मागणी;शिक्षक संघाच्या पनवेल येथील अधिवेशनात तात्यांची तुफान फटकेबाजी..


प्राथमिक शाळांमधून देशाचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत.पण घरापासून पतीची शाळा हजार किलोमीटर व पत्नीची शाळा सातशे किलोमीटर अंतरावर असेल तर त्यांचा प्रवासातच सगळा वेळ जातो..मग शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण आनंदायी कसे होईल ?.यासाठी पती पत्नी एकत्रीकरणा नुसार बदली धोरण राबवले पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात तात्या यांनी ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार,हसन मुश्रीफ,जयंत पाटील,सुनिल तटकरे,आदिती तटकरे  यांच्यासह उपस्थित मंत्रीमहोदयांकडे केली.


महाराष्ट्रराज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन पनवेल येथे संपन्न झाले.त्यावेळी थोरात तात्यानी आपल्या रांगड्या व मिश्किली भाषेत विविध मागण्या मांडल्या.महाराष्ट्रातील शिक्षकांचा बुलंद आवाज, ढाण्या वाघ म्हणुन तात्यांची ख्याती सर्वदूर आहे.कोणताही गंभीर विषय अगदी हलक्या फुलक्या व विनोदी भाषेत मांडून वरिष्ठांना त्याची दखल घेण्याची कला त्यानां अवगत आहे.
ज्या ठिकाणी शाळा आहे. त्याच गावात शिक्षकांनी राहण्याचा आदेश काढला जातो,ग्रामसभेचा ठराव घ्यावा लागत आहे.पण विविध वाड्या वस्त्यांवर,ग्रामीण भागात आजही शिक्षकांना राहण्यासाठी घरे उपलब्ध होत नाहीत.दिवसातील  दोन अडीच तास वेळ प्रवासात जातो.शिक्षक पती पत्नींची बदली एकाच शाळेत करा.त्यांच्या राहत्या गावातील शाळेत करा.हे दोन पर्याय शक्य नसतील तर दोन गावे जवळ असावीत...दोघांनाही एकाच गाडीतून बसून जाता येईल किंवा एकाच गाडीवरून जाता येईल अशा गावात त्यांची बदली करा.शिक्षक जर आनंददायी असेल तरच तो शाळा आनंददायी बनवू शकेल.त्याचबरोबरएकल लोकांचा ही विचार करावा. अशी मागणी त्यांनी करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून या मागणीला पाठिंबा दिला.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

एकच मिशन जुनी पेन्शन....

२००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जूनी पेन्शन योजना सुरू करा.त्यांच्या भविष्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे.या मागणीची फाईल मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेली आहे.लवकरच सर्व मंत्रीमंडळांनी सकारात्मक निर्णय घ्यावा.जुन्या पेंशन मुळे सरकारी तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नाही.शिक्षक रिटायर झाल्यावर तीस बत्तीस वर्षानंतर ही रक्कम द्यायची आहे.ही मागणी मान्य झाल्यास तुमचे आघाडी सरकार तीस बत्तीस वर्षे सत्तेत राहिलेच म्हणून समजा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पवार साहेब मात्र शिक्षकांचं ऐकतात...

शाळेत गेलं की पोरग ऐकत नाही...घरात गेलं की बायको ऐकत नाही...मात्र पवार साहेबांच्या कडे मागण्या घेऊन गेलो की ते शांतपणे ऐकून घेतात व समस्यांचे निराकरण करतात.देशातील जाणत्या नेतृत्वाचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत आहेत.आपल्या सर्व मागण्या मान्य होतील यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका.


माझ्या शिक्षकांचे प्रश्न सुटले की मला आमदारकी मिळाली....!

संभाजीराव थोरात तात्यांचे भाषण सुरू असतानाच पवार साहेब तात्यांना आमदार पदी संधी द्या अशी मागणी उपस्थित शिक्षक वर्गामधून झाली.त्यावेळी शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी शेवटच्या 
श्वासा पर्यंत लढत राहीन.ज्यावेळी राज्यातील शिक्षकांचे प्रश्न संपतील तिच माझ्यासाठी आमदारकी असेल.एकदा आमदारकी मिळाली पण संघटना फुटली पण आता आम्ही सर्वजण शिक्षकांच्या प्रश्नासाठी पुन्हा एकसंघ आहोत व लढत राहू.
To Top