Sanvad News चिऊताईला हक्काच घर मिळवून देण्यासाठी इस्लामपूरच्या शिक्षक पतीपत्नीची धडपड ; चला आज संकल्प करू...चिऊताईला हक्काचं घर देऊ..!

चिऊताईला हक्काच घर मिळवून देण्यासाठी इस्लामपूरच्या शिक्षक पतीपत्नीची धडपड ; चला आज संकल्प करू...चिऊताईला हक्काचं घर देऊ..!


निसर्ग आणि पर्यावरण यामध्ये पक्ष्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाढते शहरीकरण आधुनिकीकरण प्रदूषण यामुळे हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. अन्नसाखळीतील त्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही बाब विचारात घेऊन इस्लामपूर येथील पक्षिमित्र आष्पाक आत्तार आणि त्यांच्या पत्नी शिक्षिका गुलजार आतार या दाम्पत्यांनी आपल्या अंगणामध्ये चिमण्यायांसह पक्षांसाठी अन्नपाण्याची तजवीज केली आहे. त्यांच्या निवाऱ्यासाठी छोटी घरटी तयार केलीआहे.आष्पाक आत्तार सदगुरु प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेरे ता. कराड येथे  तर सौ.गुलजार आतार या श्री. माणकेश्वर विद्यालय सुरुल ता.वाळवा येथे शिक्षक पदी कार्यरत आहेत.

गेल्या तीन चार वर्षापासून आत्तार दाम्पत्यांनी राबवलेला हा उपक्रम चिमण्यांसह पक्षांना वरदान ठरत आहे. चिमणी सह अनेक पक्षी त्यांच्या अंगणामध्ये पहायला मिळत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे अनेक पक्षी पाण्यावाचून तडफडत असताना पक्षिमित्र आष्पाक आत्तार यांनी पाणी पाजून त्यांना जीवदान दिले आहेत. त्यांच्या अंगणात लावलेल्या या घरट्यात पक्षी तर आहेतच शिवाय गच्चीवर लावण्यात आलेल्या वेली फुलांच्या कुंड्यांमध्ये ही पक्षांनी आपले बस्तान बसवले आहे.

आत्तार यांनी टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेली घरटी आकर्षक तर आहेतच शिवाय त्यावर लिहिलेला पक्षी, प्राणी तसेच निसर्ग संवर्धनाचा मजकूर अत्यंत हृदयस्पर्शी आहे.आत्तार दाम्पत्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अनुकरणही केले आहे.

समाजातील प्रत्येकाने हा उपक्रम राबवला तर नामशेष होणाऱ्या चिमण्या आणि पक्षी पुन्हा आपल्याला आपल्या अंगणात बागडताना दिसतील. आपल्या अंगणाचे परिसराचे सौंदर्य वाढेल पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण होईल.पक्षिमित्र आष्पाक आत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये चिमण्यांसाठी  अन्न पाण्याची तजवीज केली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चिमणी सह अनेक पक्षी आज आमच्या अंगणामध्ये बागडत आहेत. त्यांचा चिवचिवाट आणि किलबिलाट आम्हाला तसेच परिसरातील नागरिकांना आनंद देऊन जातो. आज जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने एक संकल्प करू चिऊताईला हक्काचं घर देऊ . नामशेष होणारी चिऊताई वाचवू पर्यावरणाचे रक्षण करू.
                                                  - सौ.गुलजार आत्तार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाढते प्रदूषण आणि शहरीकरणामुळे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. त्यांचे संवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण करणे आज प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ जागतिक चिमणी दिवस साजरा करून न थांबता वर्षभर त्यांच्या अन्नपाण्याची आपण तजवीज करुया. त्यासाठी आपल्या परिसरामध्ये अंगणामध्ये शक्य असेल तिथे पक्ष्यांच्या अन्न पाण्याची आपण तजवीज करून त्यांचे प्राण वाचवू या.
                                      - पक्षिमित्र : आष्पाक आत्तार


To Top