Sanvad News जिल्हा परिषद शाळा गणेश नगर येथे जागतिक जलदिन अनोख्या पद्धतीने साजरा .

जिल्हा परिषद शाळा गणेश नगर येथे जागतिक जलदिन अनोख्या पद्धतीने साजरा .


जागतिक जल दिन जिल्हा परिषद शाळा गणेश नगर दुधोंडी तालुका पलूस येथे अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.कु  जान्हवी  भोसले इ.4 थी या विद्यार्थ्यांनी रेन वॉटर हारवीस्ट मॉडेलची निर्मिती अतिशय आकर्षक व उपयोग अशी निर्मिती केली आहे.  पावसाचा एक थेंब वाया जाऊन देणार नाही अशा प्रकारची प्रतिज्ञा केली. 
या टाकाऊ मॉडेल पासून माझ्या शेताच्या घराच्या छपरावरील मोठ्या इमारतीवरील पावसाचे पाणी बाहेर जाऊन देणार नाही याचे नियोजन केले आहे. भूगर्भातील पाण्याचा रास  टाळण्यासाठी प्रत्येक इमारतीवरील पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य आहे  तामिळनाडू हे पहिले राज्य आहे. हा प्रकल्प 2001 मध्ये लॉन्च करण्यात आला रेन वॉटर हर्वेस्ट म्हणजे विशिष्ट माध्यमातून पावसाचे पाणी साठवणे किंवा गोळा करण्याची प्रक्रिया होय पाऊस पडतो अशा ठिकाणी पाणी साठवणं प्रणाली योग्य आहे. या प्रणालीची किंमत चारशे चौरस युनिट मध्ये नवीन घर बांधताना केवळ बाराशे ते पंधराशे रुपये खर्च येतो. या प्रकल्पामुळे तयार झालेल्या या प्रकल्पामुळे पाणी सिंचनासाठी वापरणे  ;कामासाठी वापरणे ,फॅक्टरी उन्हाळ्यात उत्तम उपाय आणि तलाव,शेत तळी यासाठी याचा उपयोग होतो .शेतकऱ्यांनाही याचा फायदा होतो.  अशा पद्धतीने टाकाऊ वस्तु पासून या प्रकल्प मॉडेल ची मांडणी करण्यात आले खूप चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक गोडी निर्माण केली. आणि पाणी चा वापर पाण्याचा वापर कसा केला जाईल याचीही माहिती विद्यार्थ्यांनी  दिली.


आदर्श शिक्षक सुनील गुरव  यांनी ही विद्यार्थीना मार्गदर्शन केले व प्रतिज्ञा घेतली. प्रकल्पासाठी जान्हवी भोसले , बाळासाहेब भोसले, रोहित भोसले, सुनिल गुरव यांनी मार्गदर्शन केले .याच बरोबर या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास भोसले पालक संघाच्या सदस्य अश्विनी भोसले विशाल भोसले नौशाद शेख  या सर्व उपस्थिती मध्ये मुख्याध्यापक यांनी सत्कार केला.       याच पद्धतीचे विज्ञान उपक्रम विज्ञान प्रकल्प ,विज्ञान साहित्य , संस्कार जाधव इयत्ता 3 री ,आराध्य साळुंखे 2 री,  कु.सई  रणखांबे सही  इयत्ता 4 थी या ही विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने    मॉडेल बनवलेले आहेत.
शाळेच्या वतीने सर्व  विद्यार्थ्यांचा गुणगौरव मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले .या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व  पालकांकडून शिक्षकाकडून सर्वांच्या कडून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
To Top