Sanvad News भिलवडी शिक्षण संकुलात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न;८६८ वृक्षांचे रोपण.

भिलवडी शिक्षण संकुलात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न;८६८ वृक्षांचे रोपण.


भिलवडी.
जागतिक पर्यावरण दिना निमित्त भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,विश्वस्त सुहास जोशी,संचालक जयंत केळकर,दादासो चौगुले,
सौ.लीना चितळे,धनंजय मस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.संस्थेच्या संकुलातील सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी,इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी,खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी या शाखांच्या परिसरात ८६८ वृक्षांचे रोपण करण्यात आले.


चितळे परिवार आणि मस्कर परिवाराने संस्थेस झाडे उपलब्ध करून दिली आहेत.सर्व शाखांच्या वतीने वृक्षांचे संवर्धन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन डॉ.बाळासाहेब चोपडे यांनी केले.
यावेळी संस्थेचे सचिव मानसिंग हाके,सहसचिव के.डी.पाटील,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,सेकंडरी स्कूल चे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या टोणपे,सौ.स्मिता माने,बालवाडी विभाग मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी,विनोद सावंत,संजय पाटील आदींसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
To Top