Sanvad News जिल्हा परिषद शाळा नं.२ पलूस येथे वारकरी दिंडी उत्साहात.

जिल्हा परिषद शाळा नं.२ पलूस येथे वारकरी दिंडी उत्साहात.


आषाढी एकादशी निमीत्त जिल्हा परिषद शाळा नं. २ पलूस मध्ये बालगोपालांची वारकरी दिंडी काढण्यात आली.टाळ,मृदं गाच्या गजरात व ग्यानबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करत ही वारकरी दिंडी निघाली.या दिंडीत डोक्यावर विठू माऊलीची मूर्ती घेतलेले,धोतर व साड्या नेसून उत्साहात सहभागी झालेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.दिंडीत विद्यार्थ्यांसह शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.उज्वला पाटील,शिक्षक श्रीमती शैलजा लाड,सौ.सुनिता पवार, संभाजी पाटील,जगन्नाथ शिंदे,मारुती शिरतोडे आदी सहभागी झाले.
To Top