शाळा शिकतांना तहान भूख हरली रे..!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतपूर वसाहत येथे सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक यांच्या सहभागाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी संपन्न झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास विठ्ठल नामाचा गजर करीत उपस्थितांनी मोठी दाद दिली.
विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या जयघोषात अत्यंत प्रसन्न अशा वातावरणात पालखीसह दिंडीमध्ये सहभाग घेतला. शाळेतील पालकांनी विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे सजवून पाठवले होते. पालखी सोहळा व प्रभात फेरी झाल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वारकरी दिंडीमध्ये शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका श्रीमती बिना माने मॅडम ,कलाशिक्षक श्री. धनंजय साळुंखे सर, सौ सुधा सुतार मॅडम, सौ. सुवर्णा सावंत मॅडम, सौ पुष्पा राजे मॅडम, श्रीमती मीनाक्षी सुतार मॅडम ,श्रीमती नंदाताई पाटील मॅडम, सौ. शितल पाटील मॅडम श्रीमती मेघा चव्हाण मॅडम, सौ सीमा नलवडे मॅडम सौ प्रीती बुरले मॅडम पालक व ग्रामस्थ सहभागी झाले.